---Advertisement---

येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

By team
On: October 10, 2024 3:27 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नुकताच दोन दिवसावर दसरा मेळावा येवून ठेपला आहे यंदा दसरा मेळावा अनेक ठिकाणी होत असल्याने राज्यात मोठी चर्चा सुरु झाली असून नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडीची सत्ता आली तर ते तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देतील, असे त्यांच्याकडून लिहून घ्या. असा आव्हान महायुतीमधील नेते देत होते. महायुती सरकारने नुकताच 15 जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याची शिफारस केली. त्यामध्ये मराठा समाजा नसल्याने मनोज जरांगेंनी यांनी संताप व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत.आता या जातींना विरोध का नाही? की त्यांना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतले. 15 जातींचा ओबीसीत समावेश करताना आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही का? छाती बडवून घेणारा तो येवल्याचा नेता कुठं गेला? मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीयवाद कशासाठी? मराठ्यांची फसवणूक केली जात आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. मागच्या दोन महिन्यापांसून सरकार छोट्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करणार आहेत, हे आम्हाला माहीत होते. पोटजाती म्हणून तुम्ही समावेश केला. मग मराठा-कुणबी एक असताना का नाही समावेश केला, असे प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!