---Advertisement---

सुरजच्या डायलॉगने अजित पवार खळखळून हसले ; चव्हाणचे होणार स्वप्न पूर्ण !

By team
On: October 12, 2024 5:38 PM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : वृत्तसंस्था

राज्यात नुकतेच बिग बॉस मराठी सीजन 5 संपले असून सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झालाय. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच लोकांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळाली. वर्षा उसगांवकर या देखील या सीजनमध्ये सहभागी झाल्या होत्या. सूरज चव्हाण हा तुटकी चप्पल आणि दोन जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. सुरूवातीपासूनच सूरजचा अंदाज प्रेक्षकांना जबरजस्त आवडताना दिसला. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या फायनलमध्ये पोहोचले. सर्वात जास्त मत पडल्याने सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झालाय.

पहिल्यांदाच बिग बॉसला होस्ट करताना रितेश देशमुख हा दिसला. रितेशचा जबरदस्त अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता झाल्यापासून लोक सतत सूरजला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सूरज हा मुळ बारामतील जिल्हातील आहे. सूरज विजेता झाल्यानंतर अनेक राजकिय लोकांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या.

आता सूरज चव्हाण हा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलाय. यावेळी काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा देखील झाली. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून सूरज चव्हाण याचा सत्कार देखील करण्यात आलाय. यावेळी सुरजच्या डायलॉगने अजित पवार खळखळून हसले देखील. सूरज चव्हाण याच्याकडे राहण्यासाठी घर नाहीये. बिग बॉसच्या घरात असताना याबद्दल अनेकदा बोलताना सूरज चव्हाण हा दिसला. आता अजिबात पवार यांनी मोठे गिफ्ट सूरजला दिल्याचे बघायला मिळतंय. एकदम चांगले घर अजित पवार हे सूरजला बांधून देणार आहेत. स्वत: अजित पवार यांनी म्हटले की, मी तुला घर बांधून देईल. आपले स्वत: चे चांगले घर असावे असे आपले स्वप्न असल्याचे सांगताना अनेकदा सूरज दिसला. अजित पवार यांनी शाल, पुप्षगुच्छ आणि शिवाजी महाराज यांनी मुर्ती देत सूरज चव्हाण याचा सत्कार केला. सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्याला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून 14 लाखांचे बक्षिण मिळाले आहे. फक्त 14 लाखच नाही तर इतरही बरीच बक्षिसे सूरज चव्हाण याला मिळाली आहेत. सोशल मीडियावरही सूरज चव्हाण याची मोठी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!