---Advertisement---

कागदपत्र तयार ठेवा ; मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष !

By team
On: October 16, 2024 5:16 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. अशातच मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. कागदपत्र तयार ठेवा, असं जरांगे म्हणालेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच आता मनोज जरांगे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक संपन्न होईल. याबाबत जरांगे पाटील म्हणाले, त्यादिवशी आपल्याला लढायचं की पडायचं हा निर्णय घ्यायचा आहे. पण मराठ्यांनी आतापासूनच सावध राहायचं आहे. सगळ्यांनी कागद पत्रासह सगळ्यांनी तयार राहा. जर लढायच ठरलं तर तुमच्याकडे 3 दिवस अर्ज भरण्यासाठी राहणार आहेत. जर या निवडणुकीत पडायचं ठरलं तर तुमचे कागद पत्र यावं जाणार आहेत. सगळ्यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटीत डबे घेऊन या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

ज्यांनी निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत, त्यांच्या सोबत मला चर्चा करायची आहे. उद्या महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी अंतरवाली सराटीत यावं. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत चर्चेसाठी यावं. 2- 3 विषयांवर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. रविवारी 20 तारखेला मराठा समाजाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला ज्याला जमेल त्याने यावं, कोणाला ही बळजबरी नाही. मला माझ्या समाजाला खर्चात टाकायचं नाही. पण वेळ आली तर आपल्याला लढावं लागेल, असं मनोज जरांगे म्हणालेत.
शक्ती प्रदर्शन आता करायची गरज नाही. ही बैठक घेऊन मला कोणावर दबाव निर्माण करायचा नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी अंतरवाली सराटीत 20 तारखेला चर्चेला यावं. एकदा जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय मागे घेतला जाणार नाही, असंही जरांगे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!