ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी केली अटक

सोलापूर वृत्तसंस्था

ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. धनादेश अनादर प्रकरणी ही झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणात त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे.

लक्ष्मण हाके यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केले. आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापू पाटलांना टफ फाइट देण्याची शक्यता आहे.

3 ऑगस्ट 2022 मध्ये लक्ष्मण हाके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा समाचार घेत त्यांनी म्हटले म्हणून शिवसेना संपली असे होत नाही, असे म्हटले होते. तर शिवसेनेत गेल्यानंतर आपल्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. अठरा पगड जातींसाठी शिवसेना काम करते, असे म्हणत सत्तेसाठी अनेकांनी शिवसेनेत फुट पाडली. मात्र आमच्या सारखे हजारो होतकरु शिवसेनेत प्रवेश करु आणि शिवसेना वाचवू असे म्हटले होते.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले.

लक्ष्मण हाके यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्षपदावर काम केले आहे. तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याचे दिसून आले आहे. यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन केले होते. तर माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेंसारखी वेशभुषा करत त्यांच्यासारखे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!