ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग.. भाजपचे निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार ?

मुंबई वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून महायुतीमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या सोबत भाजपचे तळ कोकणातील नेत्यांसह माजी खासदार निलेश राणे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.

निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे निलेश राणे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच हा पक्षप्रवेश पार पडल्यास त्यांची उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नारायण राणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनं या चर्चाना उधाण आले हे. तर निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी या पूर्वीच दिली आहे. त्या पाठोपाठ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले केलं.

निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र युतीमध्ये एकमेकाचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. आमची युती एवढी घट्ट आहे की यात एकमेकाचे उमेदवार बदलले जातील, अशी रोखठोक भूमिकाही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. दरम्यान आज निलेश राणेंसह तळ कोकणातील प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या चर्चेसाठी एकत्र आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे निलेश राणे लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का? याकडे सर्वच लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!