---Advertisement---

बापरे.. आमदाराच्या गाडीत सापडले 5 कोटींचे घबाड 

By team
On: October 22, 2024 1:24 PM
Follow Us:
---Advertisement---
पुणे वृत्तसंस्था 
विधानसभा निवडणूका घोषित झाल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यातील भोरजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीत 15 कोटी रुपयाची रोख रक्कम सापडल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी हे पैसे जप्त केले आहेत. पैसे सापडलेली गाडी शिंदे गटातील गद्दार आमदाराची बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली. मात्र उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. संजय राऊत यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट शेयर करत ” काय बापू, काय झाडी काय डोंगर” असा निशाना साधत “मिंधे यांनी प्रत्येक आमदाराला 75 कोटी रुपये पाठवले असून 15 कोटीचा हा पहिला हप्ता” असं नमूद केलं आहे. त्यामुळे मोठं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
खासदार संजय राऊतांचे  ट्विट
खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटींची रोकड पकडली : आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता राज्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. पुणे ग्रमीण पोलिसांनी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर बंदोबस्त लावला आहे. सोमवारी रात्री बंदोबस्तात तपासणी करताना साताऱ्याकडं जाणाऱ्या एका कारमध्ये चार जण बसलेले होते. या कारची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात तब्बल 5 कोटीची बेहिशोबी रोकड आढळून आली. यावेळी पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेत त्या चार जणांची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
 साताऱ्याकडं जाणाऱ्या कारमधील चार जणांकडून पोलिसांनी तब्बल 5 कोटी रुपयाची बेहिशोबी रोख ताब्यात घेतली आहे. या कारवाईनंतर पोलीस आणि जिल्हा निवडणूक अधिकारी या पैशांची मोजणी करत आहेत. या चार जणांकडं रोख रक्कम कुठून आली ? या रोख रकमेचा स्त्रोत काय ?, आदी बाबीचां तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
 ‘काय झाडी काय डोंगर’
 कारमध्ये 5 कोटी रुपयाची रक्कम आढळून आल्यानंतर उबाठा गटाचे नेते कासदार संजय राऊत यांनी सोशल माध्यमात एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी,
“मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले !
हे आमदार कोण?
काय झाडी…
काय डोंगर….
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले
१५ कोटी चा हा पहिला हप्ता!
काय बापू..
किती हे खोके?” असं नमूद केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!