---Advertisement---

दिवाळीनिमित्त अन्नछत्र मंडळात फराळ वाटप

By team
On: October 30, 2024 2:21 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या “समर्थ महाप्रसाद” सेवेच्या लाभार्थ्यांना सालाबादप्रमाणे आपुलकी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व नव भारत मित्र मंडळ, कारंजा चौक यांच्या वतीने संस्था अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विशाल तथा मुन्ना राठौर यांच्याकडून दिवाळीच्या सणानिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान अन्नछत्र मंडळात फराळ वाटपाच्या वाहनाचे पूजन न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी आपुलकी बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विशाल तथा मुन्ना राठौर, अविराज सिद्धे, कांतु लांडगे, अनिल बिडवे, वैजुनाथ मुकडे, शाम पुकाळे, नितीन कटारे, शैलेश राठौर, संजय घनाते, शिवलिंग कलबुर्गी, राजू शिंपाळे, अमर पाटील, पिंटू राठौर, बाबू पुकाळे, प्रकाश हरवाळकर, समर्थ अळ्ळोळी, विकास राठौर, बालाजी सुरवसे, प्रकाश टाके, मैनुद्दीन कोरबू, बाळासाहेब कुलकर्णी, सरफराज शेख, राहुल लोणारी, सोहेल नदाफ, अविनाश पोतदार, रवी सुतार, सलीम हगलदिवटे, मंजुनाथ कोरे, विजयकुमार मानकर  हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, पुरोहित संजय कुलकर्णी, गणेश भोसले, स्वामिनाथ गुरव, रमेश हळसंगी, संतोष माने, निखील पाटील, भारत पाटील, प्रविण घाडगे, गोटू माने, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, धानप्पा उमदी, पिंटू हळूरे, श्रीशैल माळी, चंद्रकांत हिबारे, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, श्री चव्हाण, राहुल इंडे, शिवू स्वामी, महांतेश स्वामी, बलभीम पवार, अक्षय टोणपे, मलंग मकानदार, खंडेप्पा पाटील, मल्लिकार्जुन गवळी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, कल्याण देशमुख, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!