---Advertisement---

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ

By team
On: November 2, 2024 1:13 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

राज्यात विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चार फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहे.

राज्यात भाजपच्या प्रचाराची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. या धामधुमीत त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात आला वाढ करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा फेर बदल करण्यात आला आहे. सध्या फोर्स १ मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले ४ कमांडो फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात येणार आहे. तर एकूण १८ जवान त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टपुढे आली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!