---Advertisement---

बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही ; खा.संजय राऊत

By team
On: November 3, 2024 11:06 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील आघाडी व महायुतीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून नुकतेच या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशीच एक अटीतटीची लढत म्हणजे पवारांच्या बारामतीतील… बारामतीत यंदा अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढत आहेत. या लढतीकडे सर्वाचंच लक्ष आहे. अजित पवार सध्या गावभेटी घेत आहेत. गावागावात जात अजित पवार प्रचार करत आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणालेत. 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आपण पाहाल. त्यामुळे कोण- काय बोलतं? कुणाचे काय दावे आहेत? याला काही महत्व नाही. त्यांना म्हणावं आधी आपण जिंकून या… अजित पवारांसह सगळ्यांना माझं सांगणं आहे की आधी आपण जिंकून या… बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!