ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षकांना प्रचाराला पाठवले, अब्दुल सत्तारांवर निवडणूक आयोगाची कारवाई

सिल्लोड वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११९ शाळेच्या मुख्याध्यापकांना वारंवार सांगूनही त्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर सादर केली नाही. निवडणूक आयोदाला गंडवणे हे अब्दुल सत्तार यांना महागात पडले आहेत. त्यामुळे माहिती सादर न करणाऱ्या तीन तालुक्यांतील ३६ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

मंत्री तथा शिंदे सेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याशी नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत ३० शाळा चालवण्यात येतात. या शाळांनी निवडणूक कामासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर टाकली नव्हती. हे सर्व प्रकरण समोर आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात सत्तार यांच्या १७ शाळा तर संभाजीनगर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामासाठी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेच्या व्यवस्थापन, मुख्याध्यापकांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले होते.

मात्र जिल्ह्यातील ११९ पेक्षा अधिक शाळांच्या प्रशासनाने ऑनलाइन माहिती भरण्यास टाळाटाळ केली. याविषयी माहिती जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर ती संख्या ९० वर पोहोचली. या शाळांवर कारवाईची नोटीस पाठविल्यानंतर ४२ शाळांनी त्यास उत्तर देत बाजू मांडली.  उर्वरित शाळांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

सत्तारांच्या ४२ शाळांबरोबरच जिल्ह्यातील ९० शाळांनाही याच कारणावरुन नोटीस देण्यात आली. नोटीस बजावून निवडणूक आयोगाने मात्र हात वर केले. निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची यादी देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असते. त्यामुळे यादी न देणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर निवडणूक कामात अडथळा आणण्याच्या कारणावरुन फौजेदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!