अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
आपलं गाव आपली दिवाळी या कार्यक्रमानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे हळदी कुंकू व सांस्कृतिक आर्केस्ट्रा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेत्री माधवी निमकर ( शालिनी) यांच्या उपस्थितीने परिसरातील महिलांचे लक्ष वेधून घेतले. महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शांभवी कल्याणशेट्टी व पूजा कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले. हळदी कुंकू सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील मराठी सिने अभिनेत्री माधवी निमकर ( शालिनी) या उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी चुंगी व पंचक्रोशीतील सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जय नारायण साळुंखे मित्र परिवाराने खूप परिश्रम घेतले यामुळे महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात एकत्रित आले, असे शांभवी कल्याणशेट्टी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन आर. जे अक्षय यांनी केले होते.प्रमुख उपस्थितीमध्ये निवृत्ती चव्हाण, महादेव माने,दिगंबर चव्हाण, गुंडू कुंभार, दीपक साळुंखे, शिवरत्न गायकवाड, परमेश्वर चव्हाण, गोविंद बोरकर, संतोष पाटील ,सैपन शेख, अभिजीत माने, संतोष यादव, मारुती बोरकर, चन्नाप्पा वर्दे गोविंद मोरे ,बाळू वावरे, बालाजी भोसले, गोट्या माने, जनार्दन चव्हाण, प्रशांत माळगे, विश्वनाथ वरदे, अनिल चव्हाण, शिवराम कुंभार, गेनप्पा लोहार ,हरीश कोळी ,महादेव चव्हाण , ज्ञानेश्वर बंडगर, दत्तात्रय कोळी, गंगाधर चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चुंगी गावातील युवा नेते जयनारायण साळुंखे व कोमल साळुंखे व मित्रपरिवाराने केले होते.
या कार्यक्रमास महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.