---Advertisement---

आमदार कल्याणशेट्टी यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा

By team
On: November 9, 2024 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी

राज्यभरात महायुती सरकारने केलेले विकासकाम आणि घेतलेले धाडसी निर्णय याच्या जोरावर नागरिकांनी पुन्हा भाजपला मतदान करून भाजप महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना विधानसभेत पाठवावे,असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी केले.अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील किरनळ्ळी येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीमध्ये जेष्ठ कार्यकर्त्याशी संवाद साधत किरनळ्ळी येथील विविध विषयांवर चर्चा केली.पुढे बोलताना तानवडे म्हणाले की, मागच्या अडीच वर्षात महायुती सरकारने अक्कलकोट तालुक्यासाठी कोट्यावधी रुपये निधी दिला आहे  यामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून यावेळी देखील महायुतीचा विजय निश्चित आहे.वागदरी भागातून आमदार कल्याणशेट्टी यांना मोठे मताधिक्य देऊन आमदार करू,असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.यावेळी माजी पं.स.सदस्य सिद्धेश्वर मठपती, ॲड.अमित कोतमिरे, भाजयुमोचे इरय्या स्वामी, अल्पसंख्याक अध्यक्ष नन्नु कोरबु,रशिद खिस्तके,आकश कोरे,हंसराज कणमुसे,शिवप्पा गाढवे,नागेश डांगे, शंकर घुमते, बसवराज डांगे व इतर भाजप महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!