अक्कलकोट वृत्तसंस्था
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अक्कलकोट शहरात भाजप महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी होम टू होम झंझावती प्रचार सुरू आहे. कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ नाईकवाडी गल्ली, टिळक गल्ली, कुंभार गल्ली, बेडर गल्ली, महादेव नगर आदी भागांमध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला.
प्रचारामध्ये माजी नगरसेवक मीलन कल्याणशेट्टी,जेष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे, सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू, दयानंद बिडवे, अतिष पवार, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सूर्यकांत कडबगावकर, लखन झंपले, सुनील गोरे, नागराज कुंभार, सुनील गवंडी, दयानंद रोडगे, शकील नायकवाडी, सलीम शेख, बाबा नायकवाडी, वाईद नायकवाडी, हनीफ शेख, निखिल पाटील, अण्णा सावंत, संतोष दुर्गे, दादा सावंत, धोंडप्पा कुंभार व महायुतीचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरासाठी अमृत दोन योजनेद्वारे सर्व जलवाहिनी बदलण्यात येणार असून शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सुमारे ७५ कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर झाला आहे. शहरातील सर्व जलकुंभ पूर्णत्वाच्या मार्गावर असून, दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी, या योजना पूर्ण करण्यासाठी व शहराच्या भरीव विकासासाठी सचिन कल्याणशेट्टी यांना पुनःश्च निवडून द्यावे, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष हिंडोळे यांनी यावेळी केले.
तसेच अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ३६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे एक आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटचा नावलौकिक होईल. तसेच अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील पर्यटनामध्ये वाढ होण्यासाठी मतदारसंघातील ६३ तीर्थस्थानांचा
विकास करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी सचिन कल्याणशेट्टी यांना पुन्हा एकदा निवडून द्यावे, असे आवाहन मीलन कल्याणशेट्टी यांनी केले.