---Advertisement---

शहराध्यक्ष टीनवालांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटमध्ये पदयात्रा

By team
On: November 11, 2024 3:07 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व तिर्थक्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवून शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सिध्दाराम म्हेत्रे यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे अध्यक्ष रईस टिनवाला यांनी केले.

विकासाच्या नावाखाली भाजपने तिर्थक्षेत्रांचे हे शहर भकास केले. कोणताही निधी न आणता बोगस निधीचे आकडे सांगुन जनतेची दिशाभूल केली आशा थापाड्या भाजपला हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही टिनवाला यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव, श्रीशैल आळ्ळोळी, सद्दाम शेरीकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राम जाधव, चंदन आडवितोटे, रामचंद्र समाणे, काशिनाथ गोळ्ळे, फारुख बबर्ची, सर्फराज शेख,‌ सुखदेव सावळे, शबाब शेख, मुबारक कोरबु, बसवराज आळ्ळोळी, बालाजी शाॅपवाले, मैन्नोद्दिन कोरबु, शिवशरण इचगे, शरणप्पा आळ्ळोळी, समीर शेख आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!