---Advertisement---

काँग्रेसची कारवाई.. १६ बंडखोरांना निलंबित

By team
On: November 11, 2024 1:23 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांवर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या १६ जणांना निलंबित केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा, शिवाजीनगर, पर्वती, गडचिरोली, भंडारा, भिवंडी, मिरा-भाईंदर, अहमदनगर शहर, कोपरी-पाचपाखाडी, यवतमाळ, राजापूर, काटोल या मतदारसंघातील बंडखोरांनी माघार घेतली नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली करून त्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.

 

 

निलंबित केलेल्या बंडखोरीची यादी

आरमोरी- आनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर

गडचिरोली – सोनल कोवे, भरत येरमे

बल्लारपूर – अभिलाषा गावतूरे, राजू झोडे

भंडारा -प्रेमसागर गणवीर

अर्जुनी मोरगाव – अजय लांजेवार

भिवंडी – विलास रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर

मीरा भाईंदर – हंसकुमार पांडे

कसबा पेठ – कमल व्यवहारे

पलूस कडेगाव – मोहनराव दांडेकर

अहमदनगर शहर – मंगल विलास भुजबळ

कोपरी पाचपाखाडी – मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे

उमरखेड – विजय खडसे

यवतमाळ – शबबीर खान

राजापूर – अविनाश लाड

काटोल – याज्ञवल्क्य जिचकार

रामटेक – राजेंद्र मुळक

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!