---Advertisement---

ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

By team
On: November 11, 2024 8:15 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन उबाठा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

राज्यसभा खासदार कडाडी हे विधानसभा निवडणुकीकरिता अक्कलकोट दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यात उबाठा सेनाचे महिला तालुका अध्यक्ष अनुराधा शिवगुंडे, श्वेता डिग्गे, सुमन वेदपाठक, स्वरोजना शाली, रिहाना शेख यांचा समावेश असून आमदार कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन आम्ही भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी भाजप शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी भाजपा महिला शहराध्यक्षपदी विजया गवंडी यांची नियुक्ती केली. शहर सरचिटणीस पदी अनुराधा शिवगुंडे तर उपाध्यक्षपदी श्वेता डिग्गे यांची नियुक्ती केली.

यावेळी विधानसभा प्रभारी चंदू पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, निवडणूक प्रमुख जयश्री बेटगिरी, प्रभाकर मजगे, मिलन कल्याणशेट्टी, रमेश कापसे, कांतू धनशेट्टी, आनंद तानवडे, नागराज कुंभार, मलकाप्पा कोगनुर,अंकुश चौगुले, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब बिराजदार, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू, ज्येष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, लिंगराज मठपती, अतिश पवार,  आनंद पवार, दयानंद बिडवे, राजकुमार झिंगाडे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!