---Advertisement---

रोज रोज गावात येऊन मुके घ्यायचे काय? भाजप उमदेवाराचं वादग्रस्त वक्तव्य

By team
On: November 12, 2024 8:46 PM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जोरदार प्रचारसभा सुरु असून अनेक नेते मंडळी वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत.  नांदेडमधील भाजप उमेदवाराचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. नांदेडमध्ये भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजप किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी वादग्रक्त वक्तव्य केलं आहे. किनवट मतदारसंघाचे भाजप उमेदवार केराम यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची किनवटच्या बोधडी येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी केलेल्या आमदार केराम यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे.

 

‘रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे बेताल वक्तव्य भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे उमेदवार भीमराव केराम यांनी केलं आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असताना आमदार भीमराव केराम यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे. भीमराव केराम गावात फिरत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होत असतानात्यानी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!