मुंबई, वृत्तसंस्था
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्फोटक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापना केला याला अनेक वर्षे लोटली आहेत, पण उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद मराठी माणसांनी अनेक वेळा घातली आहे. पण याबाबत दोघांमध्ये कधी चर्चा झाली झाली नाही. मात्र दोन दिगग्ज नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे असा विषय अधून-मधून निघतो. पण या मुद्द्यावर
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हटले आहे की, उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेक लोक फिल्डिंग लावत आहेत. यात काही आतले आणि काही बाहेरचे लोक आहेत. पण मी माझ्याकडून मी अलर्ट असतो. कोण काय बोलतो हे मला कळतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
हिंदुत्ववादी शिवसेनेचा वर्सोव्याचा उमेदवार हारून खान असेल. त्यांचे दिंडोशीचे उमेदवार उर्दूतून पत्रके काढत असतील. काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून कुठेही बाळासाहेब ठाकरेंचे नावही घेतले जात नसेल, काँग्रेसची मफलर गळ्यात घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील तर सगळ्याच गोष्टींचा व्यभिचार करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे. अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
राज ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत आता आमची लढाई चौघांच्याही विरुद्ध आहे. अशा पद्धतीची निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत झाली नाही. सात पक्ष एकमेकांविरुद्ध उभे आहेत. कोण कुणाविरुद्ध निवडून येईल ये सांगता येणार नाही.