---Advertisement---

अक्कलकोटमध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांची जाहीर सभा

By team
On: November 13, 2024 4:38 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

२५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिल शिवाजी बंडगर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. अक्कलकोट येथील कांदा बाजार येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेसाठी रासपचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजितकुमार पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी या जाहीर सभेस विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!