अक्कलकोटला चांगला पर्याय देण्यासाठी प्रयत्नशील
वंचितचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा मैंदर्गी भागात प्रचार
अक्कलकोट वृत्तसंस्था
आपण खोटे बोलणार नाही. दिशाभूल करणार नाही. तालुक्याला विकासासाठी एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न मी करतोय, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी केले. बुधवारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचे कंटेहळी , बोरी उमरगे , मिरजगे, मैंदर्गी, संगोगी, बणजगोळ, निमगाव, हत्तीकणबस, मुगळी, भोसगा, चिक्केहळळी आदी ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
जेसीबीने फुले उधळून आरती ओवाळून फटाके फोडून ढोल ताशा हलगीच्या गजरात उमेदवार इंगळे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी विविध गावात कॉर्नर बैठक संपन्न झाली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करा, असे आवाहन केले.
संतोषकुमार इंगळे यांनी पदयात्रा काढून मतदारांना संपर्क साधला. या प्रचार दौऱ्यात सुरेखा संतोषकुमार इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यप्रवक्ते रविराज पोटे, माथाडी कामगार आघाडी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, गंगाराम वाघमारे, रमेश बनसोडे, साहिल कांबळे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.