---Advertisement---

महायुती सरकारने पोहरागडच्या विकासासाठी भरीव तरतूद केली

By team
On: November 18, 2024 3:12 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

 

महायुती सत्तेत आल्यानंतर सर्वच जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यात विशेष करून बंजारा समाजाकडे त्यांनी लक्ष देऊन तीर्थक्षेत्र पोहरा गडच्या विकासासाठी ७०० कोटी रुपये दिले. त्यामुळे बंजारा समाजाने भाजपच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन धर्मगुरू रामदास महाराज यांनी केले.

रविवारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील जेऊरवाडी येथे महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ  बंजारा समाजाचा मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना महाराज म्हणाले की,महायुतीचे सरकार बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संत सेवालाल समृद्धी योजना सुरू केली. केवळ योजना सुरू केली नाही तर त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली. खऱ्या अर्थाने या समाजाला न्याय देण्याचे काम या राज्यातील सरकारने केले त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी धर्मगुरू रामदास महाराज यांनी सर्व समाजबांधवांना भाजपा महायुतीला  मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले तालुक्यात बंजारा समाजाची संख्या कमी असली तरी भाजपचे तालुकाध्यक्ष या समाजाला देऊन या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम आम्ही केले.

अनेक तांड्यावर मोठ्या प्रमाणात निधी दिला. भविष्यातही अनेक योजना आणि निधी या समाजासाठी आपण देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, महिबुब मुल्ला,शिवलाल राठोड, परमेश्वर यादवाड, संदीप राठोड, शिवाजी राठोड,महादेव चव्हाण, श्रीकांत चव्हाण, सिताराम राठोड, सेवालाल राठोड, पंडित चव्हाण,बंटी राठोड,रवि राठोड, सुरेखा राठोड,शिवलीला पाटील आदिंसह भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्याला माता, भगिनी, बाल, वृद्ध सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!