---Advertisement---

राज्यात निकालापूर्वी ‘भावी मुख्यमंत्री’ पदासाठी पोस्टरबाजी !

By team
On: November 22, 2024 3:28 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. त्याआधीच प्रदेशात पोस्टरबाजी सुरु झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अजित पवारांच अभिनंदन असा मजकूर पोस्टरमध्ये आहे. महायुतीमध्ये या पोस्टरची चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निकाल येण्याआधीच लॉबिंग सुरु केलय. पर्वती विधानसभा क्षेत्र आणि बारामतीमध्ये प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराने हे बॅनर लावले आहेत. यात मतमोजणीआधीच मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. रस्त्यावर लागलेल्या या पोस्टर्सची राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांनी चारवेळा महाराष्ट्राच उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्यांना अजून मुख्यमंत्री बनता आलेलं नाही. मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अजित पवार यांनी आतापर्यंत अनेकदा व्यक्त केली आहे. काका शरद पवार यांची साथ सोडून ते सरकारमध्ये भाजपासोबत सहभागी झाले. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

उद्या 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात कोणाचं सरकार बनणार ते क्लियर होईल.चारवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री होतात का? याकडे सगळ्यांच लक्ष असेल. बहुताश एग्झिट पोल्सनी एनडीएच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडीच्या सरकारला बहुमत मिळेल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडी 145 ते 155 जागा जिंकून सरकार बनवण्याचा दावा करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!