---Advertisement---

हा जनतेचा कौल नाही, संजय राऊत बरसले

By team
On: November 23, 2024 5:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

 

विधानसभा निकालावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. मोदी – शहा – फडणवीस यांनी काय दिवे लावले की ते 120 च्या पुढे गेले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजपचे मन मोठे नाही तर कारस्थान मोठे आहेत.  राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीच्या फेऱ्या सध्या पूर्ण झाल्या असून यात महायुतीला आघाडी मिळतांना दिसत आहे. त्यावरून यात काहीतरी गडबड असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.

सध्याचा जो कौल आहे, याला कौल कसा म्हणावे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा जनतेचा कौल नव्हता, आम्ही ग्राउंडवर होतो, त्यामुळे आम्हाला जनतेचा कॉल माहिती होता. हे निकाल अदानी यांनी लावून घेतले आहेत. या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही माणणाऱ्या माणसाचा विश्वास बसूच शकत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.भाजपने महाराष्ट्र विकायला काढला, त्याला आम्ही विरोध करत होतो. हा विरोध मोडून काढण्यासाठीच हा निकाल लावून घेतला असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. असे निकाल महाराष्ट्रात कधीच लागणे शक्य नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!