ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना अक्कलकोटकरांचा पुन्हा एकदा कौल

म्हेत्रेंचा ४९ हजार मतांनी धक्कादायक पराभव

अक्कलकोट वृत्तसंस्था 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट विधानसभेच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा तब्बल ४९ हजार ५७२ मतांनी दारून पराभव केला आहे. कल्याणशेट्टी यांनी सलग दुसऱ्यांदा  या निवडणुकीत बाजी मारली आहे. या निवडणुकीत कल्याणशेट्टी यांना १ लाख

४८ हजार १०५ तर प्रतिस्पर्धी म्हेत्रे यांना  ९८ हजार ५३३ मते पडली आहेत.तर उर्वरित संतोषकुमार इंगळे (वंचित बहुजन आघाडी)  ३ हजार ८०७, पूजा पाटील (अपक्ष )  १४९, शिवलिंगप्पा वंगे (अपक्ष) ४२२, प्रसाद बाबानगरे (अपक्ष)२४३, सुनील बंडगर (राष्ट्रीय समाज पक्ष)१३१२, इकरार हसन शेख (बहुजन समाज पार्टी) ६९४ , मल्लिनाथ पाटील (महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) १२९३, ज्ञानोबा साळुंखे (अपक्ष )३११, सिद्धाराम कोळी (अपक्ष )२२८,जमीर शेख (प्रहार जनशक्ती पार्टी) ७९८ अशी मते मिळालेली आहेत.

शनिवारी,सकाळी आठ वाजता नवीन तहसील कार्यालयात पोस्टल मतमोजणीने प्रारंभ झाला. त्यानंतर हळूहळू कल स्पष्ट होत गेले. पहिल्या फेरीपासून अकराव्या फेरीपर्यंत सचिन कल्याणशेट्टी हे आघाडीवर राहिले. बारा, चोवीस आणि पंचवीस या तीन फेऱ्या वगळता कुठेही काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. तब्बल २३ फेऱ्यांमध्ये भाजपने आघाडी मिळवून मोठा विजय संपादन केला आहे. पहिल्या फेरीत गंगेवाडी, कासेगांव, उळे, उळेवाडी, वडजी, वरळेगांव, बक्षीहिप्परगे, मुळेगांव, मुळेगांव तांडा या गावाचा समावेश होता. या ठिकाणी कल्याण शेट्टी यांना ७ हजार २६९ तर म्हेत्रे यांना ४ हजार २७३ मते मिळाली.

दुसऱ्या फेरीत मुळेगांव तांडा, दोड्डी, बोरामणी,तांदुळवाडी , पिंजारवाडी, मुस्ती, मुस्ती तांडा या गावांचा समावेश होता. यात कल्याण शेट्टी यांना ७ हजार १३८ तर म्हेत्रे यांना ४ हजार २९७ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत मुस्ती, संगदरी , दर्गनहळ्ळी, कुंभारी या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याण शेट्टी यांना ७ हजार ५१०

तर म्हेत्रे यांना ३ हजार ४६४ मते मिळाली. चौथ्या फेरीत कुंभारी,कर्देहळ्ळी, शिर्पनहळ्ळी, धोत्री, दर्शनाळ या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ६ हजार ४४१ तर म्हेत्रे  यांना ३ हजार ५०१ मते मिळाली.

पाचव्या फेरीत दर्शनाळ, आरळी,पितापूर,बोरेगांव,वडगांव, रामपूर, तोगराळी, गुर्देहळ्ळी, हणमगांव, शिंगडगांव, लिंबीचिंचोळी या गावांचा समावेश होता. यात कल्याणशेट्टी यांना ६ हजार १०३ तर मैत्री यांना ४ हजार २३१ मते मिळाली. सहाव्या फेरीत दिंडुर, तीर्थ, डोंबरजवळगे, नन्हेगांव, हन्नुर, चुंगी, सुलतानपूर, काझीकणबस , किणीवाडी, किणी या गावांचा समावेश होता. यात ७ हजार ३०३ मते कल्याणशेट्टी यांना तर ४ हजार ८७० मते यांना मिळाली. सातव्या  फेरीत किणी, कुरनुर, बावकरवाडी, ब-हाणपूर , चप्पळगांव, चप्पळगांववाडी, दहिटणेवाडी या गावांचा समावेश होता कल्याणशेट्टी यांना ५ हजार ८४० तर  म्हेत्रे यांना ४ हजार २१९ मते मिळाली.

आठव्या फेरीत हालहळ्ळी अ, वळसंग, करजगी, हालचिंचोळी, आचेगांव, औज (अ )या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ६ हजार ३१५ तर म्हेत्रे यांना ३ हजार ५५९ मते मिळाली. नवव्या फेरीत तिल्हेहाळ्ळ, आलेगांव, हजंगी, कोन्हाळी, हसापुर, दहिटणे, सिंदखेड, मोट्याळ, बादोलाबु या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ५ हजार ७८८ तर म्हेत्रे यांना ३ हजार ५८७ मते मिळाली.

दहाव्या फेरीत बादोला खु, पालापूर,घोळसगांव,किरनळ्ळी, बोरगांव , सापळा,सांगवी बु, सांगवी खु,कोळीबेट, अक्कलकोटमधील भिमनगर एक व शहाजी हायस्कुल एक बुथचा समावेश होता. या कल्याणशेट्टी यांना ५ हजार ७८१ तर म्हेत्रे यांना ४ हजार १२५ मते मिळाली. अकराव्या आणि बाराव्या फेरीत अक्कलकोट शहरातील ३२ बुथचा समावेश होता. यामध्ये  १० हजार १३७ मध्ये कल्याणशेट्टी यांना तर  ८ हजार ३०१ मते म्हेत्रे यांना मिळाली.

तेराव्या फेरीत अक्कलकोट शहरातील ,बँगेहळ्ळी, जेऊर या गावांचा समावेश होता. यात कल्याणशेट्टी यांना ४ हजार ९९३ तर म्हेत्रे यांना २ हजार ६४३ मते मिळाली.चौदाव्या फेरीत जेऊर, करजगी,मंगरुळ या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ६ हजार ४५९ तर म्हेत्रे यांना ४ हजार २२७ मते मिळाली.

पंधराव्या फेरीत सुलेरजवळगे, चिंचोळी न, कुमठे,केगांव बु,केगांवखु, तडवळ, मुंढेवाडी,कोर्सेगांव, कल्लकर्जाळ  या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ७ हजार ८८३ तर म्हेत्रे यांना २ हजार ८१६ मते मिळाली.सोळाव्या फेरीत धारसंग, शेगांव,आळगी, गुड्डेवाडी, अंकलगी, खानापूर, म्हैसलगी, देवीकवठे, कुडल, आंदेवाडी खु, आंदेवाडी (बु)या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ६ हजार ८३४ तर म्हेत्रे यांना २ हजार ५२१ मते मिळाली. सतराव्या फेरीत आंदेवाडी बु, हिळ्ळी,शावळ, घुंगरेगांव, कलहिप्परगे, हंद्राळ, गौडगांव बु, नाविंदगी,कडबगांव या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ५ हजार ६९३ तर म्हेत्रे यांना  ४ हजार २०० मते मिळाली. अठराव्या  फेरीत जेऊरवाडी, सेवालाल नगर, दोड्याळ, मातनळ्ळी, नागनहळ्ळी, बासलेगांव, ममदाबाद, निमगांव, बणजगोळ, सदलापूर,शिरवळ या गावांचा समावेश होता.  यामध्ये कल्याण शेट्टी यांना ४ हजार ९२८ तर म्हेत्रे यांना ३ हजार ३६५ मते मिळाली.

एकोणिसाव्या फेरीत शिरवळवाडी, वागदरी, भुरीकवठे, खैराट, गोगाव,सलगर या गावांचा समावेश होता.यात कल्याणशेट्टी यांना ५ हजार १८४ तर म्हेत्रे यांना ३ हजार ३४३ मते मिळाली. विसाव्या फेरीत सलगर, चिकेहळ्ळी, हत्तीकणबस, गौडगांव खु, रामपूर, कंठेहळ्ळी, जकापूर, गळोरगी, उडगी,गुरववाडी या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ५ हजार ६५६ तर म्हेत्रे यांना ३ हजार ९५७ मते मिळाली.एकविसाव्या फेरीत गुरववाडी, मराठवाडी, नागणसुर,हैद्रा, तोळणूर या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ५ हजार ९९० तर म्हेत्रे यांना ४ हजार ३३ मत मिळाली. बावीसाव्या फेरीत तोळणूर, कलप्पावाडी, सातनदुधनी, हालअळ्ळी मै, मैंदर्गी या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ४ हजार ६९७ तर म्हेत्रे  यांना ४ हजार ३६९ मते मिळाली.

तेविसाव्या फेरीत मैंदर्गी, मिरजगी, उमरगे, संगोगी अ, तोरणी,भोसगे, नागुरे,इब्राहिमपूर,संगोगी ब,बिंजगेर, तळेवाड या गावांचा समावेश होता.यामध्ये कल्याणशेट्टी यांना ५ हजार ३१३ तर म्हेत्रे यांना ४ हजार ४१५ मते मिळाली.चोविसाव्या फेरीत तळेवाड, बोरोटीखु, बोरोटी बु,बबलाद, चिंचोळी मै, आंदेवाडी ज, रुद्धेवाडी , मुगळी, दुधनी या गावांचा समावेश होता. यामध्ये कल्याणशेट्टी यांना ४ हजार ६९६ तर म्हेत्रे यांना ४ हजार ७०८ मत मिळाली.पंचविसाव्या फेरीत दुधनी ,सिन्नुर या गावाचा समावेश होता.

यामध्ये कल्याणशेट्टी यांना २ हजार ८१२  तर म्हेत्रे यांना ४ हजार ५६६ मत मिळाली. पोस्टल मतांमध्ये सुद्धा भाजपने आघाडी घेतली. मतमोजणीच्यावेळी गोकुळ शुगरचे  चेअरमन दत्ता शिंदे,जेष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, अण्णाराव बाराचारी, महेश बिराजदार, महेश हिंडोळे,आनंद तानवडे, सागर कल्याणशेट्टी,अविनाश मडीखांबे,नन्नू  कोरबू, नागराज कुंभार उपस्थित होते. मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

 

सचिनदादांनी मोडला स्वतःचाच रेकॉर्ड

अक्कलकोटच्या इतिहासामध्ये २०१९ च्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ३७ हजार मते घेत विक्रम प्रस्थापित केला होता.आता हा विक्रम त्यांनीच २०२४ च्या निवडणुकीत मोडून रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या विषयाची चर्चा दिवसभर सुरू होती. विक्रमवीर सचिन दादा या नावाचे फलके अनेक ठिकाणी झळकत होते.

 

विरोधकांच्या टीकेला मतपेटीतून उत्तर

विरोधकांनी या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात जाऊन अतिशय खालच्या पातळीवर टीका केली होती. या आरोपांना जनतेने मतपेटीतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आणि हा कौल म्हणजे जनतेने विकासाला दिलेले  मत आहे. या विश्वासाला मी नक्कीच पात्र राहील. या निकालातून जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे.

– सचिन कल्याणशेट्टी, नूतन आमदार

 

 

गुरववाडीच्या मतमोजणीत तांत्रिक बिघाड

२६ वी जी फेरी झाली.त्या फेरीमध्ये गुरववाडी बुथवरचे मतदान होते आणि या बूथमध्ये  काही काळ तांत्रिक बिघाड झाला होता. यानंतर मतमोजणी पूर्ण झाली.त्यामध्ये सचिन कल्याणशेट्टी यांना ५५८ तर म्हेत्रे यांना १०२ मते पडली.या फेरीमध्ये देखील ४५६ मतांची आघाडी ही भाजपाला मिळाली.

 

 

फटाक्यांची आतषबाजी  आणि आनंदोत्सव

पंधराव्या फेरीनंतर जसे मताधिक्य वाढत  गेले. तसे मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजपचा झेंडा घेऊन गुलालांची उधळण करत जल्लोष करण्यात आला. याचवेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आगमन झाले.अक्कलकोट शहर आणि तालुक्यात देखील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!