---Advertisement---

आमदार कल्याणशेट्टी स्वामी चरणी नतमस्तक

By team
On: November 24, 2024 11:01 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वप्रथम श्री स्वामी स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी वटवृक्ष देवस्थानच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी अभिनंदन करून त्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद  देवून सत्कार केला.

यावेळी बोलताना  आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, मी व माझे संपूर्ण कुटूंब स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त  आहोत. आपल्या आज पर्यंतच्या राजकीय व सामाजिक कार्यात स्वामी समर्थांचे आशिर्वाद व तालुक्यातील जनतेचे प्रेम व शुभेच्छा आपणांस मोलाचे आहेत. या माध्यमातून आपणास भूतकाळात व वर्तमान काळात लाभलेलं आमदार पद हे तालुक्यातील विकासकामांची साखळी कायम करण्यासाठी मतदारांनी दिलेली अमूल्य संधी आहे. यामुळे आपण सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभारी आहोत असे सांगून स्वामी समर्थांचे आशीर्वाद व तालुक्यातील जनतेची आपल्यावरील निष्ठा यामुळेच आपणांस यंदाही विधानसभेच्या निवडणूकीत विजय संपादन होवून सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आपणास विधानसभेत पाठविले असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

या विजयानंतर तालुक्यात आणखीन जोमाने कार्य करण्यास स्वामी समर्थांनी आपणांस आशिर्वाद द्यावे याकरीता समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, बाळा शिंदे, राजू झिंगाडे, मनोज कल्याणशेट्टी, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, चंद्रकांत गवंडी, संतोष जमगे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सिध्दाराम कुंभार, संजय पवार,  प्रसाद सोनार आदिसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!