---Advertisement---

मोठी बातमी.. देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

By team
On: November 25, 2024 6:13 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली वृत्तसंस्था

 

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय संपादन केला असून आता महाराष्ट्राचा  मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून होत आहे. मात्र अजूनही भाजपचे याबाबत काहीच ठरलेलं दिसत नाहीय.  दरम्यान मित्रपक्षांनी बैठक घेत गटनेता निवडीचा निर्णय घेतला. त्यातच आता मोठी बातमी समोर आलीय.

महायुतीला 240 जागांवर यश आल्याने महायुतीचं राज्यात सरकार बनणार हे स्पष्ट झालं आहे.  एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या सर्व आमदारांसह काल मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आला. यापैकी एकनाथ शिंदे यांना सर्वानुमते गटनेता बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही काल मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांची पक्षाचा गटनेता म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. पण भाजपमध्ये तशा काहीच घटना घडल्या नाहीत. तसेच  महायुतीचा आगामी मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत एका खासगी कार्यक्रमासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील दिल्लीला या कार्यक्रमात जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानंतर रात्री साडेदहा वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचा देखील निर्णय होणार असल्याची माहिती आहे. याबाबत आज निर्णय झाल्यास उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.

 

.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!