ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! राज्यातील सोयाबीनचे दर वाढले

मुंबई, वृत्तसंस्था

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  राज्यात विधानसभा निवडणूक संपताच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले असल्याने  शेतकऱ्यांना खुशखबर मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात या वर्षी सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. एकूण खरीप क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. उत्पादनही विक्रमी येणार असाच अंदाज होता. सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४८९२ रुपये इतके किमान आधारभूत मूल्य जाहीर केले असले तरी सुरुवातीच्या काळात हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती.

ऐन निवडणुकीत सोयाबीनचे भाव चार हजाराच्या आतच होते. यासाठी राज्य सरकारने राज्यात हमीभावाने खरेदी केंद्रे उघडली परंतु निवडणूक काळात ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाहीत. त्यामुळे दरावर चर्चा होण्याची गरज होती. विविध बाजार समित्यांमध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. विशेषत: पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव ४८९२ इतका जाहीर करत हमीभाव केंद्रे सुरू केली. दर वाढल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!