अक्कलकोट वृत्तसंस्था
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी हे पन्नास हजार इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला असून या विजयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची अनमोल साथ मिळाली असल्याचे मत तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले आहे. सन 2019 ते 2024 या पंचवार्षिक आणि 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मित्रपक्ष म्हणून खांद्याला खांदा लावून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने खंबीर दिली आहे. रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले व प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे सचिन कल्याणशेट्टी यांना पूर्ण तन मन धनाने ताकतनिशी साथ दिली आहे.
यंदाही त्याची प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले 2019 मध्ये देखील अविनाश मडीखांबे यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढून दलित व इतर समाजाची मते भारतीय जनता पक्षाकडे वळवली होती. या विधानसभा निवडणुकीत दलित, अल्पसंख्यांक मते विभागली जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु अविनाश मडीखांबे यांनी 2019 प्रमाणे यावेळीही संपूर्ण तालुका आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्यांने पिंजून काढून मोक्याच्या ठिकाणी आपल्या खास आक्रमक शैलीत रोखठोक भाषणाने मतदारांची मने जिंकून आंबेडकरी जनतेचे मते महायुतीच्या पारड्यात टाकली. दांडगा जनसंपर्क आणि युवा नेतृत्व यामुळे नेहमी महायुतीला अविनाश मडिखांबे यांनी खंबीर अशी साथ दिलेली आहे. काँग्रेस किंवा वंचित कडे दलित नेते वळतील असे अनेकांनी तर्क लावलेले असताना सुद्धा अविनाश मडीखांबे यांच्या मतदारसंघातील संपर्कामुळे आणि प्रचारामुळे आंबेडकरी मते महायुतीला पडून सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या मताधिक्य वाढण्यास मदत झाली.
दुधनी विभागात भागात रिपाईंचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, संतोष जन्ना, मैंदिमीय्या जिडगी, तडवळ विभागात सिद्धार्थ गायकवाड, उमेश शिवशरण राजू बोरगावकर, राजू गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, दिलीप माळी, उत्तम वाघमारे, बापू वाघमारे, करण शिंदे, जेऊर विभागात युवक अध्यक्ष आप्पा भालेराव,अंबादास गायकवाड, श्रावण भालेराव, सचिन बनसोडे, मैंदर्गी शहरात युवक जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरु,शाणप्पा मनिकडे,सुनिल मनिकडे,किरण दुबेकर, भिमशा आरेनवरु, हणमंत शिंंगे, शिवचलप्पा किरगल, शिवनिंगप्पा आरेनवरु, बसवराज पोतेनवरु, सलगर विभागात राजू भगळे,बसवराज निम्मे, जयभिम भगळे, मलकण्णा सोनकांबळे, मल्लू नडगेरी, दादा चव्हाण, अक्कलकोट शहरात शहराध्यक्ष अजय मुकणार, युवा नेते राहुल रुही, सरचिटणीस शुभम मडिखांबे, उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे, रोमीत मडिखांबे,वरपक्ष माने, नितेश मडिखांबे, प्रणेश बनसोडे, सुरेश गायकवाड, अंबादास शिंगे, ताजुद्दीन शेख, दत्ता मामा मडिखांबे, भारत सोनकांबळे, विजयकुमार बाळशंकर, सिध्दाराम मडिखांबे, विजय मडिखांबे, नागेश मडिखांबे,प्रकाश मडिखांबे, लखन वेसकर, बंटी मडिखांबे, अजय मडिखांबे, आकाश मडिखांबे नागणसुर विभागात तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे,चंद्रकांत गायकवाड,यमनप्पा शिंदे, बाबू निरगुडी, राजू कांबळे, शरणू गायछोडे, बसवराज गजधाने, सलगर विभागात जयकुमार सोनकांबळे, विकास टोणगे, परमेश्वर ऐवळे, सायबण्णा गायकवाड, शिवानंद दोडमनी, रमेश बनसोडे, सिध्दू पैलवान, रमेश दोडमनी, बाबू कांबळे, वागदरी विभागात शिरवळ शाखाध्यक्ष तथा ग़्रामपंचात सदस्य उत्तम गायकवाड, भिमा गायकवाड, वालचंद सोनकांबळे, शिवानंद सोनकांबळे, दयानंद सोनकांबळे, विलास गायकवाड, विजय साखरे, संदीप सोनकांबळे, संदीप इंगळे, विशाल इंगळे, भिम इंगळे,शांतकुमार इंगळे, उत्तम इंगळे, किशोर गायगवळी, चप्पळगाव विभागात राजकुमार गवळी, संतोष बाळशंकर, मनोज सोनकांबळे, शेखर सोनकांबळे,मंजू बनसोडे, आशिष उकरंडे, राजकुमार बनसोडे यांनी आपापल्या भागात हिरीरीने सहभागी होऊन महायुतीचे उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
तसेच रिपाईंचे पश्चिम महाराष्ट्र युवा नेते राहुल रूही आणि तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यामध्ये प्रचारात आघाडी घेऊन महायुतीला निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. अक्कलकोट तालुक्यातील रिपाईच्या सर्व शाखा अध्यक्षांनीआपापल्या गावांमध्ये मताधिक्य मिळवून देण्यासाठी कामे केल्याचे दिसून आले. 2019 पासून 2024 पर्यंत रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या प्रामाणिक आणि निर्णायक साथीमुळे महायुतीला सर्व निवडणुकांमध्ये यश आल्याचे दिसून येते. भविष्यामध्ये महायुतीचा महत्वाचा घटक पक्ष म्हणून रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी कशाप्रकारे सहकार्य करुन सत्तेत वाटा उपलब्ध करुन काम करण्याची संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.