अक्कलकोट वृत्तसंस्था
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांच्या मागणीनुसार विविध उपाय योजना न्यास करीत असते, याचाच एक भाग म्हणून गोवा राज्यासह सिंधुदुर्ग- कोकण येथील स्वामी भक्तांच्या सेवेर्थ न्यासाकडून पाठपुरावा केल्याने थेट वास्को ते अक्कलकोट ही गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टची बस सेवा सुरु झाल्याने स्वामिभक्तातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान अक्कलकोट ते वास्को ही गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्ट बसचे पूजन अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरची बस सुरु करण्यासाठी स्वामी भक्त गोवा राज्याचे मुख्यमंत्री ना.प्रमोद सावंत, परिवहन मंत्री मोहीन बुदीनो, गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्याकडे न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, श्रीक्षेत्र अक्कलकोटचे सुपुत्र गोवास्थित अमोल कालिदास कोळी, निलेश पेडणेकर यांनी सदर बस सुरु करण्याकरिता वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
बस पूजना प्रसंगी गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टचे सहाय्यक वाहतूक अधिकारी सुहेश सावंत, चालक मल्लिकार्जुन शिंदे, महेंद्र हजेरी, वाहक रफिक पटेल यांच्यासह न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, भारत पाटील, न्यासाचे लेखा परीक्षक ओंकारेश्वर उटगे, सौरभ मोरे, कायदे विषयक सल्लागार अॅड. संतोष खोबरे, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, रोहन शिर्के, डॉ.विनायक बुधले, निखील पाटील, प्रविण घाडगे, गोटू माने, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, पृथ्वीराज पोळ, प्रतिक पोळ, गोविंद शिंदे, राहुल इंडे, पिंटू साठे, बालाजी कटारे, स्वामिनाथ बाबर, विशाल कलबुर्गी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महामंडळाचे अधिकारी, चालक-वाहक यांचा सत्कार न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर बस ही वास्को वरून दररोज सायंकाळी ७ वा. सुटणारी बस ही श्री क्षेत्र अक्कलकोटला दुसर्यादिवशी सकाळी ७.३० वा. आणि अक्कलकोटहून सायंकाळी ६.१५ वा. सुटणार बस ही वास्कोला दुसर्यादिवशी सकाळी ७.३० वा. पोहोचणार आहे. ही बस पणजी, पत्रादेवी, बांधा, म्हापसा, कुडाळ, कणकवली, सांगली, मिरज, कोल्हापूर, पंढरपूर मार्गे सोलापूर अक्कलकोटला पोहोचणार आहे. सुरु झालेल्या बस सेवेमुळे स्वामिभक्तातून समाधान व्यक्त होत आहे.