ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रशासनाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करावे

शिक्षक समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

अक्कलकोट, वृत्तसंस्था  

 

तालुकास्तरीय आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार सन २०२३-२४ आणि सन २०२४- २५ साठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची तरतूद जि.प.सेस फंडातुन करण्यात आलेली आहे. प्रशासनाने नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडून शाळा आणि शिक्षकांच्या चांगल्या कार्याचा गौरव करावा आणि या दोन्ही वर्षातील तालुकास्तरीय

आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे गटविकासाधिकारी शंकर कवितके तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्याकडे शिक्षक समितीचे नेते दयानंद चव्हाण यांनी केली आहे.

निधी उपलब्ध नसतानाही तत्कालीन गटशिक्षणाधिकारी कुदसिया शेख यांनी सन २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षातील शिक्षक पुरस्काराचे यशस्वी आयोजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने शिक्षणमहर्षी स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन जवळपास ८० शिक्षकांचा गौरव केला होता.त्याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी प्रशासनाचे  कौतुक केले होते.

प्रशासनाने मराठी माध्यम ८, कन्नड माध्यम २ आणि उर्दू माध्यम १ अशा एकूण ११ पुरस्कारासाठी १० ऑक्टोबर २०२४ अखेर प्रस्ताव सादर करणेबाबत तसेच जास्त प्रस्ताव सादर झाल्यास गुणांनुक्रमे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल, असे कळविले होते.प्रस्तावासाठी भरमसाठ जाचक अटी, पुरस्काराची संख्या कमी करणे  आणि प्रशासनाची शिक्षकांच्या बाबतीतील भूमिका यामुळे प्रस्तावासाठी शिक्षकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला.वारंवार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊनही शिक्षक प्रस्ताव का सादर करत नाहीत ? यावर विचारमंथन व्हावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती शिक्षक समितीचे नेते दयानंद चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!