---Advertisement---

विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे

By team
On: December 19, 2024 12:58 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर, वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची निवड झाली आहे.

 

महायुतीकडे असलेले संख्याबळ पाहता महाविकास आघाडीने विधानपरिषदेचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे विधानपरिषदेसाठीसाठी राम शिंदे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची विधानपरिषदेच्या सभापतीसाठीची निवड निश्चित मानली जात होती. बुधवारी त्यांनी उमेदवारी दाखल केला. उमेदवारी जाहीर होताच राम शिंदे यांनी नेत्यांसह पक्षाचे आभार मानले होते.

 

आमदार राम शिंदे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा , चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीचे सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. उद्या सकाळी नागपुरातील विधानभवनात 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे’.

 

राम शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस म्हणून ओळखले जाते. ते 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा अवघ्या 1200 मतांनी त्यांचा पराभव झाला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!