ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एसटी कामगार सेनेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

नाशिक वृत्तसंस्था 

नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.  कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्षप्रवेश झाला आहे.

नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाझे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एसटी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले. 40 आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरु आहे. आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!