---Advertisement---

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनी लाखो भाविकांनी घेतले दर्शन !

By team
On: January 11, 2025 11:02 AM
Follow Us:
---Advertisement---

अयोध्या :  वृत्तसंस्था

देशातील रामभक्तांचे श्रद्धेचे स्थान असलेले अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा आज पहिला वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. राम मंदिरामुळे विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी रामलल्लाची महाआरती करणार आहेत. राम मंदिराला विदेशी फुलांनी सजवण्यात आले आहे. अयोध्येचे तापमान ४ अंश आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्ली, हिमाचलसह 10 राज्यातून लोक रामलल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत.

मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, आज 2 लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेतील. मंदिर ट्रस्टने अंगद टिळा येथे जर्मन हँगर तंबू लावले आहेत. 5 हजार पाहुणे येतील, त्यापैकी 110 व्हीआयपी पाहुणे असतील. येथे रामकथा होणार आहे. 11 ते 13 जानेवारी दरम्यान उत्सव होणार आहेत. या ३ दिवसांत व्हीआयपी दर्शन होणार नाही. सकाळी 6.30 ते रात्री 9.30 पर्यंत सामान्य दर्शन सुरू राहील.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!