---Advertisement---

मोठी बामी : अधिवेशनाला हजेरी मात्र नाराजी कायम ; छगन भुजबळ !

By team
On: January 18, 2025 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

शिर्डी : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर हे शिर्डी मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकाकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर हे कोणत्याही एका व्यक्तीचे शिबिर नाही. तर ते पक्षाचे शिबिर आहे.

त्यामुळे नाराजी दूर झाली हा मुद्दाच येत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अधिवेशनाला येण्याची विनंती केली होती. त्यानुसार मी अधिवेशनाला आलो असल्याचे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर अजित पवार यांनी कोणत्याच प्रकारचा संपर्क साधलेला नसल्याचे देखील भुजबळ म्हणाले.

आपल्याला प्रफुल्ल पटेल येऊन भेटले तसेच त्यांनी दोन तास आपल्याशी अधिवेशनाला येण्याच्या संदर्भात चर्चा केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील आपल्याला फोन करून थोड्या कालावधीसाठी तरी अधिवेशनाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यानुसार आपण अधिवेशनाला आलो असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. मात्र अधिवेशनाला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असा अर्थ होत नाही, असे देखील भुजबळ यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी फोन केला होता का? असा प्रश्न देखील पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला होता. मात्र छगन भुजबळ यांनी ‘नाही’ या एकाच शब्दात या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार यांची चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अशी चर्चा झाल्याचे वृत्त छगन भुजबळ यांनी फेटाळले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ आणि अजित पवार या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकमेकांच्या समोरासमोर येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!