अक्कलकोट : प्रतिनिधी
लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांच्या नेतृत्वाखाली कापसे फाउंडेशन या एका नवीन सामाजिक संस्थेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्व समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी काम करण्याचे अभिवचन कापसे यांनी दिले आहे. कापसे यांनी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष, डिस्ट्रिक्टचे(पश्चिम महाराष्ट्र) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व संपूर्ण महाराष्ट्राचे(मुंबई वगळून) व्हॉईस चेअरमन म्हणून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांना लायन्स इंटरनॅशनलचा सन्मान प्राप्त झाला आहे.
पुणे येथे पत्रकार दिना निमित्त राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार वितरण समारंभात अक्कलकोट येथील पत्रकार राजेशकुमार जगताप यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले होते. त्याची दाखल घेऊन कापसे फाउंडेशनच्या वतीने राजेशकुमार जगताप यांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य श्री शेख नुरदीन बाबा दर्ग्याचे सज्यादे अहमदपाशा पिरजादे हे होते.प्रा.सूर्यकांत कडबगावकर, शिवशरण खूबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात अक्कलकोट येथील पत्रकार योगेश कबाडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, शिवा याळवर, कवी होटकर इत्यादी उपस्थित होते.