---Advertisement---

खळबळजनक : महाकुंभमेळ्यात आग, अनेक तंबू जळून खाक !

By team
On: January 30, 2025 4:19 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

प्रयागराजमध्‍ये सुरु असलेल्‍या महाकुंभमेळ्यात दि.२८ रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेगरीत ३० भाविक ठार तर ५० भाविक जखमी झाल्याची घटना ताजी असतांना आता दि.३० दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ मधील घडलेल्‍या दुर्घटनेत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यात आली आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे वृत्त ‘ANI’ने दिले आहे.

छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आज दुपारी एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये आग लागली आहे. तत्‍काळ अग्निशमन दलाच्‍या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक तंबू जळून खाक झाले होते. सिलेंडरमधील गळतीमुळे ही दुर्घटना झाली हेती.

आज आगीच्‍या दुर्घटनेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे महाकुंभ मेळा परिसरात उपस्थित होते. बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्‍या दुर्घटनाचा त्‍यांनी आढावा घेतला. बुधवारी महाकुंभमेळ्यात झालेल्‍या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ६० भाविक जखमी झाले. यातील ३६ जणांवर रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!