ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…जे कोणी गुन्हेगार आहे थेट फाशीची शिक्षा द्या : पंकजा मुंडे !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील सरपंच खून प्रकरणामुळे देशभर बीड शहराचे नाव चांगलेच चर्चेत आले असतांना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा आता देशपातळीवर होत आहे. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे आणि परळी मतदारसंघावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीड आणि परळीतील घटनांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट विधान केले. या घटना सर्वच ठिकाणी घडत आहेत. परळी परळी करु नका. तुमचा फोकस परळीकडे आहे. यात जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, या घटना होऊ नयेत. ही एक प्रवृत्ती आहे. परळी परळी करु नका. प्रत्येक ठिकाणी घटना घडत आहेत. तुमचा फोकस परळीकडे आहे. घटना सर्व ठिकाणी घडत आहेत. माझ्याकडे माहिती आलेली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घडत आहे, याची संपूर्ण माहिती आहे. कुठेही अशाप्रकारची घटना घडणे चूक आहे. या घटना घडणे चुकीच्या आहेत. यात जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांना पकडायला हवे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, या जिल्ह्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक आहेत, असे अजित दादांनी सांगितले. पण एखाद्या घटनेमुळे किंवा दुर्देवी प्रसंगामुळे आपल्या जिल्ह्याची प्रतिमा डागळायला नको. ते उद्योग दूर जायला नको. मी पालकमंत्री असल्यापासून इथे विमानतळ व्हावे यासाठी मी देखील प्रयत्न करत होते. पण जेव्हा शासनाने शासकीय जागा हवी असा निर्णय घेतला आणि तेवढी शासकीय जागा एकाच ठिकाणी मिळणे हा प्रश्न होता. तो प्रश्न कसा सोडवायचा असे अजित दादांना विचारले. त्यावर त्यांनी आपण हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!