---Advertisement---

मंत्री मुंडे नशीबवान माणूस, पवार छातीचा कोट करून उभे ; आव्हाडांची पोस्ट चर्चेत !

By team
On: January 31, 2025 10:44 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या अटकेत आहे. मात्र वाल्मिक कराड यांच्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचा हात होता. धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्यामुळेच वाल्मीक कराड याने गुंडागिरी केली असल्यास आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी देखील वारंवार केली जात आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा देखील समावेश आहे. या आधी देखील जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

धनंजय मुंडे नशीबवान माणूस आहे. त्यांच्या पाठीमागे अजित पवार हे छातीचा कोट करून उभे आहेत. मात्र मी कमनशिबी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आव्हाड हे सातत्याने आरोप करत आहेत. इतके सगळे झाले तरी देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे.

या संदर्भात धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणार नसल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्यास सांगितले तर आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र अजित पवार यांनी अद्याप धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही. दोषी आढळले तर सर्व दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे हे नशीबवान माणूस असल्याचे म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेले पोस्ट देखील पहा…
पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊन सुधा दादा छाती चा कोट करून उभे आहेत ..
मी किती कमनशिबी आहे ..
२०१९ मंत्री झालो पालक मंत्री साठी चढाओढ सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते .. पण..
एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे ३ आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत.
सत्य देवाला माहीत पण मी काही पालक मंत्री होऊ शकलो नाही
मग मी साहेबांन मुळे सोलापूर चा पालक मंत्री झालो आणि मला कोरोना ची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर …
अश्या खूप जखमा आहेत
पण कधीच हिशोब दिला नाही की मी हे केले मी ते केले..
२००४ ते २o१४ जेव्हा कोणी उभे राहीला तयार नव्हते तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघड पणानी दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लवायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन …..मीच करतो मीच करतो असे केले नाही
…कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!