---Advertisement---

देवासाठी बोकड आणला मात्र पहाटेच्या सुमारास बिबट्यानेच केली पार्टी !

By team
On: January 31, 2025 4:04 PM
Follow Us:
---Advertisement---

चंद्रपूर : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून अनेक भागातील बिबट्याची संख्या वाढली आहे तर अनेक ठिकाणी शेतासह परिसरात गाव तांड्यावर देखील बिबटे हल्ले करीत असतांना एक धक्कादायक बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने बिबट्यांचा भद्रावतीत तांडा वस्तीमध्ये वावर आढळून येता आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. मानव-बिबट यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी ठोस धोरण आखण्याची सबंधित प्रशासनाला लक्ष द्यायची गरज आहे.

तांडा येथील गरीब शेतकरी युवक सोनु धारवत यांनी घरील देवादिकांच्या कार्यक्रमाकरीता दोन बोकड एक बकरी विकत घेतल्या होत्या. दरम्यान पहाटे अंदाजे ४ वाजता घरात शिरून त्या पशुधनावर बिबट्याने डल्ला मारून फडशा पाडला. प्राथमिक अंदाजाने सुमारे ६५ ते ७० हजार रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचे सोनु धारवत शेतकर्‍याकडून मिळालेल्या माहितीतून लक्षात येत आहे. सदरील घटनेची माहीती शेतकर्‍याने वनविभाग दिली असता घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. बिबट्याची दहशत परीसरात पसरली असून झालेल्या नुकसानीची भरपाई वनविभागाने सबंधित प्रशासनाकडून देण्यात यावी तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी सोनु धारवत यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!