ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर : तुळजापूर जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात : ३ ठार तर १५ जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने सुरु असतांना आता सोलापुर जिल्ह्यात मोठा अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू तर १५ जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. सध्या या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळ ट्रक, मिनीबस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यावेळी ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने राँग साईडला जाऊन मिनी बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मिनी बस थेट पलटी झाली. यामुळे बसमध्ये असलेले प्रवाशी जखमी झाले. या मिनी बसमधील भाविक तुळजापुरात देवदर्शनासाठी जात होते.

या दुर्घटनेत बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनी बस बाजूला करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!