ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राहुल सोलापूरकर पुन्हा सापडले वादात : वादग्रस्त व्हिडीओने खळबळ !

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका होवू लागल्या होत्या त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती  आता पुन्हा एकदा अभिनेते राहुल सोलापूरकर नव्या वादग्रस्त व्हिडीओने पुन्हा अडचणीत आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्याबद्दल राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर नुकतेच ते प्रकरण थंड झाले होते. मात्र, रविवारी व्हायरल झालेल्या त्यांच्या नव्या व्हिडीओने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.

छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका करताना वेदांमध्ये चातुर्वर्ण्य वितरण कसे केले आहे, याविषयीची माहिती देताना सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक देण्यात आले होते. परंतु, कर्मानुसार ते ब्रह्मण ठरतात, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात असून, अनेकांनी सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याने व्यथित झालेल्या सर्वांची आपण जाहीर माफी मागत आहोत, अशा शब्दांत राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. त्यासंबंधी प्रसार माध्यमांकडे पाठविलेल्या चित्रफितीत बोलताना ते म्हणतात की, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका करताना एका प्रसंगात वेदांमधील एका वाक्यात चातुर्वर्ण्याचे वितरण कसे ठरते, याचे विश्लेषण केलेले आहे.

व्यक्तीच्या कर्मानुसार ते ठरते, असा त्याचा अर्थ होतो. या भूमिकेतील नेमके हे वाक्य उचलून काही जण समाजाचे मन कलुषित करत आहेत. समाजात वावरत असताना गेली 40 वर्षे आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर आदी महामानवांपुढे नतमस्तक होऊन त्यांच्यावर व्याख्याने दिली आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून जगत असलेली कोणतीही व्यक्ती त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करू शकत नाही. तरीही या वक्तव्याने कोणाची मने दुखावली गेली असल्यास पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!