नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देखील भाष्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अभिनेता राहूल सोलापूरकर यांचा समाचार घेतला आहे.
छगन भुजबळ यांनी यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवरही भाष्य केले. राहुल सोलापूरकर हे भांडारकर संस्थेमध्ये कुणीतरी सदस्य होते. ते विद्वान ग्रहस्थ आहेत. पण त्यांनी कुठपर्यंत बोलायचे याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन आग्र्ह्याहून सुटले. यामुळे डोक्यात तिकीड निर्माण झाली. हे कोण लोक आहेत? औरंगजेब अख्ख्या हिंदुस्थानचा राजा होता. त्याला कोण लाच देणार? समजा लाच दिली असती तर लहानशा संभाजीला महाराजांनी काशीमध्ये कशासाठी लपवून ठेवले होते. महाराज जेव्हा गडावर पोहोचले तेव्हा माता जिजाऊंनी त्यांना संभाजी कुठे आहेत? असा प्रश्न केला. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. शिवाजी महाराज खरेच लाच देऊन आले असते तर ते उघडपणे आले असते. हे लोक काहीही बरळतात. या लोकांना इतिहास बदलण्याचा कुणी अधिकार दिला.
राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीही वादग्रस्त विधान केले. पुराणमध्ये विद्गवान पुरुष ब्राह्मण असतात असे लिहिले असेल. परमेश्वराने सर्वांना बुद्धी सारखीच दिली आहे. त्या बुद्धीचा चांगला वापर जे लोक करतात मग ते कोणत्याही समाजाचे का असेना खूप मोठी झाली आहेत. बाबासाहेब दलित समाजात जन्माला आले हे खरे आहे. पण ते प्रचंड विद्वत्ता घेऊन जन्माला आले. त्यांना अनेकांनी मदत केली. त्यांनी त्यांच्या विद्वत्तेचा वापर केवळ पैसे कमावण्यासाठी केला नाही. त्यांनी त्याचा वापर दलित समाजाच्या उत्थानासाठी केला. त्यांनी जगातील एक अतिशय उत्तम संविधान तयार केले. या संविधानाचा अभ्यास करून इतरही देश आपल्या देशाची राज्यघटना तयार करत आहेत. बाबासाहेबांविषयी असे चागंले सांगितले पाहिजे. उगीचच काहीही बोलले तर लोकांना वाईट वाटणारच. त्यांनी यापुढे अशी वादग्रस्त विधाने करू नये. त्यांना इतिहास बदलण्याचा कोणताही मक्ता नाही, असे भुजबळ म्हणाले.