ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अयोध्येला जातांना नांदेडच्या भाविकांच्या गाडीला अपघात : ४ ठार तर १६ जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहे. तर कुंभमेळ्यात स्नान करून अयोध्याकडे जाणाऱ्या नांदेडच्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा रविवारी पहाटे उत्तर प्रदेशात अपघात झाला. ही मिनी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या खासगी बसला धडकली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. मृतांमध्ये नांदेडमधील तीन, तर वसमत (जि. हिंगोली) येथील एका महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बाराबांकीत पूर्वांचल एक्स्प्रेस रोडवर हा अपघात झाला. मृतांमध्ये सुनील वरपडे (५०), अनुसया वरपडे (८०) या मायलेकासह दीपक गोदले स्वामी (४०, तिघे रा. नांदेड) व जयश्री चव्हाण (५०, रा. वसमत) यांचा समावेश आहे. १० फेब्रुवारीच्या रात्री नांदेडच्या छत्रपती चौकातून एकमेकांचे नातेवाईक असलेले २३ जण प्रयागराजला गेले होते. रविवारी पहाटे ५.३० वाजता ते अयोध्येच्या दिशेने निघाले होते. प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणीपत्रा पोलिस ठाण्यात हद्दीमध्ये पूर्वांचल मार्गावर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नादुरुस्त खासगी बसवर धडकलेली टेम्पो ट्रॅव्हलर अक्षरश: चक्काचूर झाली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!