---Advertisement---

भक्‍ती, शक्‍ती आणि युक्‍ती हे मराठी भाषेचे सामर्थ्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी !

By team
On: February 21, 2025 7:13 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राजधानी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे संमेलन रविवारपर्यंत चालेल. आज दिल्लीत ग्रंथ दिंडी काढून या संमेलनाची शोभा वाढवण्यात आली. यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची काश्मिरी कन्या रुकय्या मकबूल हिच्या आवाजात मराठीप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या प्राकृत भाषेतील सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या मंगलकामना करणाऱ्या जैन धर्मातील नवकार मंत्राने सुरुवात झाली.

मराठी भाषेमध्ये जशी शूरता आहे तशी विरताही आहे, संवेदनाही आहे आणि सहवेदनाही आहे म्‍हणूनच भक्‍ति शक्‍ती युक्‍ती हे मराठी सामर्थ्य आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ज्ञानेश्वर तुकारमांचे स्‍मरण करुन त्‍यांनी दिल्‍ली मराठी भाषेला अभिवादन करत असल्‍याचे म्‍हटले. अखिल भारतीय साहित्‍य संमेलन हे एका राज्‍यापूरते मर्यादित राहिले नसून ते आता देशपातळीवर गेले आहे. दिल्‍लीमध्ये हाणाऱ्या या संमेलनाला माझ्या हस्‍ते उद्धाटन झाले हे माझे भाग्‍य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्‍ते दिपप्रज्‍ज्‍वलनाने ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद्धाटन झाले. दिल्‍ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्‍यनगरी (तालकटोरा स्‍टेडियम ) येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरवातीला त्‍यांनी सर्व उपस्‍थितांचे आभार मानले. ‘आज जागतिक मातृभाषा दिन आहे. अतिशय चांगला दिवस तुम्‍ही साहित्‍य संमेलनासाठी निवडला’ असे अस्‍खलित मराठीत बोलून त्‍यांनी आपल्‍या भाषणाची सरुवात केली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!