---Advertisement---

खळबळजनक : समुद्रात बुडून दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू

By team
On: February 22, 2025 4:18 PM
Follow Us:
---Advertisement---

मालवण : वृत्तसंस्था

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा  बसू लागल्यानंतर अनेक जण पर्यटनस्थळी जात आहे. अशातच पुणे, हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. एका युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दि.२२ सकाळी ११. २० च्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली. रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २४) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले.

किनारावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तत्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्या आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मृत घोषित केले. मात्र, ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अधिक उपचार करण्यासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी सामील होते. मालवण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!