ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहाटेच्या सुमारास चारचाकीतील सीएनजी गॅसने घेतला पेट : दोघांचा मृत्यू

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंप व नायरा पंपाच्यामध्ये रस्ता दुभाजकाला इर्टिगा धडकली. गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतल्याने गाडी आणि गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांसह दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्दैवी घटना दि. २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचले असून यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना माहिती दिली तसेच अग्निशामक दल यांनादेखील ताबडतोब माहिती दिली.

सविस्तर वृत्त असे कि, जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले. मात्र तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला. पेटत्या गाडीत मृत्यू झालेल्यामध्ये जामखेडचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी नरेश गुडवाल (वय ३५) व जामखेड शहरातील साईनाथ पान शॉपचे मालक महादेव काळे (वय २८) हे होते. गाडीची दुभाजकाला जोराची धडक बसल्याने गाडीचे टायर घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटांवर फेकले गेले.

इर्टिगा गाडी अत्याधुनिक पध्दतीची असल्याने गाडी लाँक झाली. त्यामुळे आतील दोन जणांना बाहेर पडता आले नाही. या दरम्यान गाडीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला. त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलीस गुडवाल यांचा मोबाईल गाडीच्या बाहेर दुभाजकच्या बाजुला पडलेला पोलिसांना निर्दशनास आला असता तो मोबाईल पोलिसांनी चौकशी करता तो मोबाईल आपल्याच पोलीस कर्मचाऱ्याचा लक्षात आले. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!