---Advertisement---

‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ; उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका !

By team
On: February 27, 2025 4:16 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे :  वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून महिलांसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होत नसताना काल पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करण्याची गय केली जाणार नाही. आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ माजली होती. अत्याचार करून फरार झालेला आरोपी स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला. दत्तात्रय रामदास गाडे असे त्याचे नाव असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथके रवाना झाली असून तपास केला जात आहे.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आमच्या लाडक्यासोबत निंदनीय प्रकार घडलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून आहे. मी स्वत: पुणे पोलिसा आयुक्तांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही सरकारच्या वतीने दिलेल्या आहेत. आरोपीचे सर्व लागेबांधे पोलिसांच्या हाती आलेले आहेत. त्याला कुठल्याही परिस्थिती तत्काळ अटक केली होईल.  अशाप्रकारचे नराधम आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही, सोडले जाणार नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे सरकारचे धोरण आणि भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याचा कोणाशीही संबंध असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. हा गुन्हेगार आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!