मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील स्वारगेट प्रकरण मोठ्या चर्चेत असून या बलात्काराची संतापजनक घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्टँड परिसरामधील सुरक्षारक्षक कार्यालयाची तोडफोड करत आंदोलन केलं.
यावेळी वसंत मोरे यांनी पर्दाफाश करत ज्या स्वारगेटच्या एसटी बस परिसरामध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडली त्याच बस डेपोमध्ये जुन्या चार शिवशाही बसेसचं लॉजिंग करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला यानंतर वसंत मोरेंनी पूर्णपणे बस स्थानकाची पाहणी केली. दरम्यान, स्वारगेटमध्ये तरूणीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनतंर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. वसंत मोरे यांनी आंदोलन केल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचं कौतुक करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरा चालेल… असं उद्धव ठाकरेंनी फोनवरून वसंत मोरे यांना सांगितलं आहे. ‘चांगलं काम केलं… असेच जागते रहा… जे काही सुरू आहे… त्याने जीव जळतो. महाराष्ट्र कुठे चाललाय? मराठी भाषेवर आक्रमण… पण चांगलं काम केलं.. ‘, असंही म्हणत ठाकरेंनी यावेळी वसंत मोरे यांचे कौतुक केलं.