ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील मोठ्या शहरात नेहमीच गुन्हेगारी उफाळून येत असतांना आता ठाण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.हिरानंदानी इस्टेट पाटलीपाडा येथे राहणाऱ्या ठाण्यातील एका व्यक्तीने बुधवारी रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या कानाचा एक भाग चावला आणि नंतर तो गिळून टाकला. हिरानंदनी इस्टेटमधील सॉलिटअर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये पार्टी झाल्यानंतर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 37 वर्षीय चित्रपट निर्माता श्रवण लीखा आणि 32 वर्षीय आयटी व्यावसायिक दोघेही हिरानंदानी इस्टेटमध्ये राहतात. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. ही घटना एका पार्टी दरम्यान सुरू झाली. ज्यामध्ये ३७ वर्षीय श्रावण लेखा आणि ३२ वर्षीय विकास मेनन हे त्यांच्या इतर मित्रांसह होते. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक दोघांमध्ये कशावरून तरी वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की विकास मेनन हिंसक झाला. रागाच्या भरात त्याने श्रवण लिखाच्या कानाचा एक भाग दातांनी चावला.
वाद इथेच संपला नाही, विकास मेननचा राग अनावर झाला आणि त्याने त्याच्या कापलेल्या कानाचा तुकडाही गिळून टाकला. या अनपेक्षित हल्ल्याने पार्टीत उपस्थित असलेले इतर लोकही थक्क झाले. जखमी श्रावण लेखाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या लोकांना स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले त्यावर विश्वासच बसत नव्हता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस कारवाईत आले आणि विकास मेननविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम ११७ (२) अंतर्गत स्वेच्छेने गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि भांडणामागील खरे कारण काय होते हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपी विकास मेननला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. पण पोलीस त्याला लवकरच पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
रागाच्या भरात घेतलेले निर्णय किती भयानक वळण घेऊ शकतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मित्रांमध्ये आनंदाचा प्रसंग असलेली एक साधी पार्टी. काही वेळातच त्याचे रूपांतर हिंसाचार आणि क्रूरतेत झाले. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि आरोपीचा शोध सुरू आहे.