---Advertisement---

मोठी बातमी : विधान परिषदेच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर !

By team
On: March 3, 2025 4:46 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर आता रिक्त पाच विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. परिषदेतील ५ आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गट एक, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर भाजपच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल.

आमश्या पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कनाड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे आता राज्याचं लक्षू लागून राहिलं आहे. आमदार आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आह. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर याच महिन्यात निवडणूक होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम?

  • १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया
  • अर्जाची छाननी १८ मार्च रोजी होणार
  • २० तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
  • २७ तारखेला विधान परिषद जागांसाठी मतदान

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!